Ad will apear here
Next
कृष्णा सहकारी साखर कारखान्यात मिल रोलरचे पूजन
कृष्णा कारखाना कार्यस्थळावर रोलर बसवण्याच्या कामाचा प्रारंभ करताना चेअरमन डॉ. सुरेश भोसले, डॉ. अतुल भोसले, लिंबाजीराव पाटील, दिलीप पाटील, गुणवंतराव पाटील, अमोल गुरव, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी आदी.शिवनगर (ता. कराड, जि. सातारा) : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यात २०१७-१८ गळीत हंगामासाठी मिल रोलरचे पूजन कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते व श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे नूतन अध्यक्ष तथा भाजपचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

या वेळी कारखान्याचे व्हाइस चेअरमन लिंबाजीराव पाटील, ज्येष्ठ संचालक गुणवंतराव पाटील, दयानंद पाटील, धोंडीराम जाधव, दिलीपराव पाटील, पांडुरंग होनमाने, संजय पाटील, ब्रिजाज मोहिते, अमोल गुरव, गिरीश पाटील, सुजित मोरे, मनोज पाटील, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, कराड नगरपालिकेचे नगरसेवक सुहास जगताप, ‘मिटकॉन’चे उपाध्यक्ष एस. सी. नातू, ‘प्राज इंडस्ट्री’चे सहायक उपाध्यक्ष उदय कुलकर्णी, डीजीएम सुदर्शन केंद्रे, कराड तालुका साखर कामगार संघाचे अध्यक्ष एम. के. कापूरकर, गणेश शिवोत्सव मंडळाचे बाळासाहेब पाटील यांच्यासह सर्व खातेप्रमुख, अधिकारी उपस्थित होते.

कारखान्याचे चेअरमन डॉ. भोसले यांच्या हस्ते धार्मिक विधी करून रोलरचे पूजन करण्यात आले. यानंतर चेअरमन डॉ. भोसले आणि डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते यांत्रिक कळ दाबून रोलर बसविण्याच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला. या प्रसंगी कार्यक्षेत्रातील मान्यवर, सभासद शेतकरी, कार्यकर्ते, वाहतूक कर्मचारी, तोडणीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QZCKBE
Similar Posts
‘‘कृष्णा’च्या कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना सुरू करणार’ शिवगनर (सातारा) : ‘कामगार हा संस्थेचा कणा असून कामगारांच्या श्रमामुळे संस्थेची प्रगती होत असते. कृष्णा कारखान्याच्या या यशस्वी वाटचालीमध्ये कामगारांचे मोलाचे योगदान आहे. म्हणून कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर सन्मानपूर्वक जगता यावे यासाठी कृष्णा कारखाना कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना राबविणार आहे,’ असे मत कारखान्याचे चेअरमन डॉ
‘मी विठ्ठलाचा व वारकऱ्यांचा सेवक’ रेठरे बुद्रुक (सातारा) :   ‘विठ्ठल रुक्मिणी समितीच्या अध्यक्षपदाचा बहुमान हा केवळ माझा बहुमान नसून सातारा, सांगली जिल्ह्यातील वारकरी सांप्रदायाचा बहुमान आहे. वारकऱ्यांच्या योगदानामुळे व पुण्याईमुळे मला ही संधी मिळाली आहे. येत्या काळात मी विठ्ठलाचा व वारकऱ्यांचा सेवक म्हणून कार्यरत राहीन,’ अशी भावना डॉ
डॉ. सुरेश भोसले यांना राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार जाहीर कराड (सातारा) : साखर उद्योग क्षेत्रात दिलेल्या अभूतपूर्व योगदानाची दखल घेऊन रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि धावरवाडी येथील ‘जयवंत शुगर्स’चे संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांना यंदाचा साखर उद्योगातील राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ‘शुगर टेक्नॉलॉजिस्ट
वारकरी हा केंद्रबिंदू मानून कार्य करणार : डॉ. अतुल भोसले कराड (सातारा) : ‘माझ्या हातून वारकऱ्यांची सेवा घडावी ही परमेश्वराचीच इच्छा असल्याने, मला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान समितीच्या अध्यक्षपदी कार्य करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे आगामी काळात वारकरी हाच केंद्रबिंदू मानून त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आणि वारकऱ्यांना अधिकाधिक सेवासुविधा पुरविण्यासाठी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language